महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ खडसे उद्या चौकशीकरीता ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमी? - जळगाव एकनाथ खडसे बातमी

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहतात की नाही, याबाबत साशंकता आहे.

eknath khadse infected with corona virus again in mumbai
एकनाथ खडसेंना पुन्हा कोरोनाची लागण?

By

Published : Dec 29, 2020, 10:01 PM IST

जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. पुण्याच्या भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी त्यांना उद्या मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्याकरीता एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी उपस्थित राहतात किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण आहे.

महिनाभरापूर्वी झाली होती कोरोनाची लागण-

एकनाथ खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहतील किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यासंदर्भात खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अ‌ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. तसेच एक महिन्यांपूर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचे आहे प्रकरण -

एकनाथ खडसे यांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तीकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी केली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना उद्या ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे.

हेही वाचा - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ३,०१८ रुग्णांचे निदान

ABOUT THE AUTHOR

...view details