महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Khadse On Girish Mahajan : गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती, एकनाथ खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल - Eknath Khadse On Girish Mahajan

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ( NCP leader Eknath Khadse ) यांनी गिरीश महाजन यांच्या टीका ( Eknath Khadse criticize Girish Mahajan ) केली आहे. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आला असून त्यांच्यावर सत्तेची मस्ती चढल्याचे ते म्हणाले.

Eknath Khadse
Eknath Khadse

By

Published : Nov 17, 2022, 10:54 PM IST

जळगाव -जामनेरमध्ये सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांची भव्य सभा झाल्याने गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी माझे पाय धरून शत्रुघ्न सिन्हांची सभा जामनेर मध्ये घेण्याची विनंती केली होती. असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. गिरीश महाजनांसाठी बोदवड येथील शत्रुघ्न सिन्हा यांची सभा रद्द करून जामनेर मध्ये घेतल्याने गिरीश महाजन विजयी झाले. माझ्यामागे गिरीश महाजन यांनी ईडी लावली म्हणूनच गिरीश महाजनांना मी मोक्का लावला - असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला.

गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती

गिरीश महाजन यांना सत्तेचा माज -राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात ( NCP leader Eknath Khadse ) गिरीश महाजन यांच्यावर टीका ( Eknath Khadse criticize Girish Mahajan ) केली आहे. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आला असून त्यांच्यावर सत्तेची मस्ती चढल्याचे ते म्हणाले. ज्यावेळी जामनेर मध्ये सोनिया गांधी यांची भव्य सभा झाली त्यावेळी गिरीश महाजन यांनी माझे पाय धरून बोदवड येथील शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेर मध्ये घेण्याची विनंती केली. मझ्या मतदारसंघातील सभा रद्द करून मी शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेरमध्ये घेतल्याने गिरीश महाजन विजयी झाले. तेच आता मला संपवण्याची भाषा करतात, त्यांनी माझ्या मागे ईडी लावली म्हणूनच मी त्याच्या मागे मोक्का लावला असा गौप्यस्फोटही एकनाथ खडसेंनी केला आहे.



एकनाथ खडसेंचा महाजनांना धक्का -जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती-जमाती विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. जामनेर तालुक्यातील काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे खडसे - महाजन यांच्यात वाक्युद्ध रंगले असतांना खडसेंकडून महाजनांच्या बालेकिल्ला जामनेरमध्ये महाजनांना धक्का मानला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details