मुंबई -ज्या भारतीय जनता पक्षामध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभे आयुष्य पक्षासाठी घातले आणि नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊच नाव वगळण्यात आले, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे रेशन कार्ड व बारा अंकी नंबर वाटप कार्यक्रमाप्रसंगी एकनाथ खडसे बोलत होते.
मी टरबूजा म्हणणार नाही, पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला - एकनाथ खडसे
ज्या भारतीय जनता पक्षामध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभे आयुष्य पक्षासाठी घातले आणि नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊच नाव वगळण्यात आले, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी टरबूजा म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला. आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावलले. मुख्यमंत्री पदाचा अधिकार हा खान्देशाचा होता. स्वातंत्र्याला 70 वर्षे होऊन गेली, मात्र खान्देशावर अन्याय करण्यात आला. 70 वर्षात कोकणात नारायण राणे, मनोहर जोशी तसे 3 मुख्यमंत्री झालेत, विदर्भातील 4 मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र झाला. मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत. मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षांत एकदाही संधी देण्यात आली नाही. चाळीस वर्षे पक्षात आम्ही हमाली केली, मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्री पदापासून डावलण्यात आल्याची खंत एकनाथ खडसे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
हेही वाचा -Speaking Trees Pachora : पाचोऱ्यातील झाडे जेव्हा बोलू लागतात, डोळ्याचे पारणे फेडणारी चित्रे