महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संगनमताने माझे तिकीट कापले. माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला.

संपादकीय छायाचित्र
संपादकीय छायाचित्र

By

Published : Jan 2, 2020, 12:02 PM IST

Updated : Jan 2, 2020, 3:29 PM IST

जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक होतो. पक्षश्रेष्ठींकडे तसे म्हणणेही मांडले होते. परंतु, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संगनमताने माझे तिकीट कापले. माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला. विशेष म्हणजे, आपल्या नाराजी नाट्यानंतर खडसेंनी प्रथमच जाहीर नावे घेत स्वकीयांवर आरोप केल्याने भाजपतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

बोलताना एकनाथ खडसे

विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ खडसे हे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने त्यांचे तिकीट कापत त्यांच्याऐवजी कन्येला तिकीट दिले होते. तेव्हापासून खडसे नाराज होते. पुढे कन्येचा पराभव झाल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली. याच विषयासंदर्भात खडसेंनी आता पुन्हा भाजपवर आरोप करत आपल्या नाराजी प्रदर्शित दिली आहे. मुक्ताईनगरात आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - गुलाबराव पाटलांचे जळगावात जंगी स्वागत; मिरवणुकीत चेंगराचेंगरी, दोन महिला शिवसैनिक जखमी

भाजपत सतत हीन वागणूक मिळत असल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यांच्या नाराजीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. दिल्ली दरबारी खडसेंना मिळालेली धक्कादायक माहिती त्यांनी प्रथमच जाहीर केली आहे. खडसे पुढे म्हणाले, मी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतो. तशी इच्छाही मी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. भाजपच्या कोअर कमिटीतील वरिष्ठ नेते माझ्या उमेदवारी संदर्भात अनुकूल होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझ्या उमेदवारीला विरोध दर्शवत माझे तिकीट कापले. ही माहिती मला कोअर कमिटीतील माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी खासगीत बोलताना दिली. कोअर कमिटीतील चर्चा उघड करणे सयुक्तिक नाही. मात्र, माझ्याविषयी घडलेला प्रकार गंभीर असल्याने मला हा विषय जाहीरपणे मांडावा लागत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच होणार; गुलाबराव पाटील यांचा दावा, काँग्रेसने काढला व्हीप

Last Updated : Jan 2, 2020, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details