जळगाव- पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांचा पराभवाला भाजपमधील काही जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया कारणीभूत आहेत. त्यांचा पराभव व्हावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडेच नाही, तर भाजपमधील अनेकजण नाराज आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यापासून नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे. सोमवारी जळगावात आपल्या 'मुक्ताई' निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी हा गौप्यस्फोट केला. खडसे पुढे म्हणाले, भाजपमध्ये पंकजा मुंडेंसह अनेकजण नाराज आहेत. पंकजा मुंडे तसेच रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करून हेतूपुरस्सरपणे पाडण्यात आले आहे. ज्यांनी हे कारस्थान केले; त्यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता असल्याचे खडसेंनी सांगितले.
पराभूत उमेदवारांशी साधी चर्चाही केली नाही