जळगाव - जळगाव जिल्हा परिषदेत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालला नाही. त्यामुळे जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. हे आजच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला चालू देणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले.
'जळगावमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालू देणार नाही' - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. आजच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला चालू देणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. दोन्ही पदांसाठी भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले होते. या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या रंजना प्रल्हाद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नशिराबाद भादली गटाचे सदस्य लालचंद पाटील यांची निवड झाली.
या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक जिंकल्यानंतर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी ऐकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.