महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात.. धावत्या कारचा फुटला टायर - jlagaon latest news

राष्ट्रवादीत नव्याने दाखल झाल्यानंतर एखनाथ खडसे यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली आहे. या दरम्यान अमळनेरमधील कार्यक्रमावरून परतत असताना खडसे यांच्या वाहनाला अपघात झाला.

eknath khadse car accident
खडसे अपघातातून बालंबाल बचावले

By

Published : Nov 1, 2020, 6:56 PM IST

Updated : Nov 1, 2020, 9:01 PM IST

जळगाव- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज(रविवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव ते जळगाव रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.

धावत्या कारचा फुटला टायर

चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व सुखरूप

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौर्‍यात अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते. अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच 19 सीई 19) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

अमळनेरहून जळगावकडे जाताना घडली घटना-

या घटनेची माहिती वार्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरली. या घटनेसंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना खडसे यांनी सांगितले की, अमळनेर येथून कार्यक्रम आटोपून जळगावच्या दिशेने जात असताना आमच्या कारचा पुढचा टायर अचानक फुटला. परंतु सुदैवाने कार उलटली नाही. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर खडसे दुसऱ्या वाहनाने जळगावला रवाना झाले.

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. तसेच खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत.

Last Updated : Nov 1, 2020, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details