जळगाव -विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला मतदान करत आपला कौल दिला आहे. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री हा महायुतीचाच व्हायला हवा. अन्यथा हा जनादेशाचा अवमान होईल, असे परखड मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
महायुतीकडून जनादेशाचा अवमान - एकनाथ खडसे - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे
सत्ता स्थापनेच्या विषयावरून भाजप आणि शिवसेना युतीत भांडण पाहायला मिळत आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपने नकार दर्शवल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या विषयासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
सत्ता स्थापनेच्या विषयावरून भाजप आणि शिवसेना युतीत भांडण पाहायला मिळत आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपने नकार दर्शवल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या विषयासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप आणि सेनेच्या वादावर बोलताना त्यांनी एकप्रकारे भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. खडसे पुढे म्हणाले की, राज्यात सत्ता स्थापनेच्या विषयावरून भाजप आणि शिवसेना युतीचे भांडण सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी मतदारांच्या विश्वासाला तडा जात आहे. हा एकप्रकारे जनादेशाचाच अवामान होत आहे. भाजप आणि सेनेच्या या भांडणात जे पक्ष अल्पमतात आहेत, ते सत्तेत बसण्याची भीती आहे. अशातच सर्व पक्षांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपला मात्र विरोधात बसावे लागेल, अशी स्थिती राहिल असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.