महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांपेक्षा राजीनामा दिलेल्या अजित पवारांनी बोलायला हवे - एकनाथ खडसे

अजित पवारांच्या राजीनाम्यावर अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे, तसेच राजीनाम्यावर अजित पवारांनी खूलासा करण्यापूर्वी इतरांनी त्यावर अंदाज व्यक्त करणे चुकीचे असल्याचे मत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडले आहे.

एकनाथ खडसे

By

Published : Sep 28, 2019, 12:48 PM IST

जळगाव -राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या विधीमंडळ पदाचा राजीनामा दिला. यावर विचारले असता, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर त्यांनी खुलासा करण्यापूर्वी इतरांनी बोलणे, चुकीचे असल्याचे मत मांडले आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे - एकनाथ खडसे

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरेतून सरकारची कामगिरी

अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या विषयासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, खडसेंनी पवारांच्या राजीनाम्यावर अधिक बोलणे टाळले.

हेही वाचा... शरद पवारांवर गुन्हा दाखल करणे ही राजकीय कृती - बाळासाहेब थोरात

शरद पवारांपेक्षा अजित पवारांनी बोलले पाहिजे - खडसे

अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत मला फारसे काही सांगता येणार नाही. त्यांचे वैयक्तिक काही कारण असू शकते किंवा कौटुंबीक वाद देखील असू शकतात. जोपर्यंत अजित पवार स्वतः खुलासा करत नाहीत, तोपर्यंत आपण काही अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे. शरद पवारांपेक्षा ज्यांनी राजीनामा दिला त्या अजित पवारांनी बोलणे गरजेचे आहे. यामुळे अजित पवार यांनी खुलासा केल्यानंतर प्रतिक्रिया देता येईल, असे म्हणत खडसेंनी अजित पवारांच्या राजीनाम्यावर अधिक बोलणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details