महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युक्रेन-रशियाच्या युद्धाचा फटका; जळगाव बाजारपेठेत खाद्यतेलाच्या भावात वाढ - खाद्यतेलाच्या दरात वाढ

युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरातील अत्यावश्यक अशा खाद्यतेलावरही परिणाम ( Russia Ukraine impact on edible oil ) झाला आहे. अर्जेंटिना, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील तसेच युक्रेन या ठिकाणाहून भारतात खाद्य तेलाची ( Impact on edible oil rate ) आयात होते. मात्र, युद्ध सुरू असल्याने ही आयात बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई तसेच गुजरातमधील कांडला बंदर येथून सद्यस्थितीत ( Gujarat Kadla edible oil supply ) तेलाचा खाद्य पुरवठा केला जात आहे.

खाद्यतेलाच्या भावात वाढ
खाद्यतेलाच्या भावात वाढ

By

Published : Mar 4, 2022, 9:34 PM IST

जळगाव - रशिया व युक्रेन युद्धाचा परिणाम खाद्यतेलाच्या दरवाढीवर ( edible oil prices hike in Jalgaon market ) झाला आहे. गेल्या दहा दिवसांत सोयाबीन व सूर्यफूल तेलाचे भाव प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी ( Sunflower rate hike in Jalgaon ) वाढले आहेत. तर प्रति 15 किलो तेलाच्या डब्यामागे 400 रुपयांची वाढ झाली आहे. आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलात भाव वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गृहीणींचे बजेट कोलमडले आहेत.

रशिया युक्रेनमध्ये जरी युद्ध सुरू असले तरी त्याचा स्थानिक बाजारपेठेतील विविध वस्तूंवर परिणाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

जळगाव बाजारपेठेत खाद्यतेलाच्या भावात वाढ

हेही वाचा-Nagraj Manjule Halgi Pune :...अन् नागराज मंजुळेंनी हलगी वाजवत धरला ठेका; पाहा, व्हिडिओ...

खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम-

युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरातील अत्यावश्यक अशा खाद्यतेलावरही परिणाम ( Russia Ukraine impact on edible oil ) झाला आहे. अर्जेंटिना, मलेशिया, इंडोनेशिया, अमेरिका, ब्राझील तसेच युक्रेन या ठिकाणाहून भारतात खाद्य तेलाची ( Impact on edible oil rate ) आयात होते. मात्र, युद्ध सुरू असल्याने ही आयात बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई तसेच गुजरातमधील कांडला बंदर येथून सद्यस्थितीत ( Gujarat Kadla edible oil supply ) तेलाचा खाद्य पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा-VIDEO : गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बस्फोटाची थरारक रंगीत तालीम

युद्धच संपेल तेव्हा खाद्यतेलाचे भाव कमी होतील-

जळगावच्या प्रसिद्ध अशा दाणा बाजारातही खाद्यतेलाचे दर वधारले आहेत. दहा ते बारा दिवसांत किलोमागे तेलाचे २५ ते २६ रुपये दर वाढले आहेत. तर १५ किलोमागे 12 दिवसांत तब्बल 400 रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर प्रति १५ किलोमागे २,७०० रुपये इतके झाले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. युद्धच संपेल तेव्हा खाद्यतेलाचे भाव पुन्हा कमी होतील, अशी अपेक्षा खाद्यतेलाचे विक्रेते यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-Ajit Pawar On OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारप्रमाणे विधेयक मांडणार - अजित पवार

गोरगरीब व सर्वसामान्यांनी कसे जगावे ?

सर्वसाधारपणे पंधरा किलो तेल खरेदी करणारे ग्राहक दोन ते तीन किलो तेल खरेदी करत आहेत. बजेट कोलमडल्यामुळे संसाराचा गाडा चालवावा, कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अचानकपणे खाद्यतेलात वाढ झाल्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खाद्यतेल प्रत्येक घरात आवश्यक असते. त्याशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. त्यामुळे खायचे काय ? याचा विचार सरकारने करायला पाहिजे.

रशिया युक्रेनमधील युद्धामुळे विविध खाद्यतेलांचे भाव वाढले आहेत. यामुळे जनता होरपळून निघाली आहे. दर कमी व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details