जळगाव - जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडला. जामनेर तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. पहिल्याच पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वाघूर नदीला मोठा पूर आला आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत.
वाघूर नदीला पहिल्याच पावसात पूर... पेरणीच्या कामाला वेग - वाघूर नदीला पूर बातमी
वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पहिल्याच पावसात नदीला पूर आला आहे. गेल्या वर्षी देखील दमदार पाऊस झाल्याने वाघूर नदीला वेळोवेळी पूर आला होता.
वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पहिल्याच पावसात नदीला पूर आला आहे. गेल्या वर्षी देखील दमदार पाऊस झाल्याने वाघूर नदीला अनेकदा पूर आला होता. जवळपास वर्षभर नदी वाहतच होती. त्यातच आता पहिला पाऊस चांगला झाल्याने नदीला पूर आला आहे. वाघूर नदीवर असलेले वाघूर धरण देखील गेल्यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते.
वाघूर धरणावरून जळगाव शहर, जामनेर शहर तसेच जामनेर आणि जळगाव तालुक्यांतील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आता तर पहिल्याच पावसात वाघूर नदीला पूर आल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहेत. हवामान खात्याने देखील मान्सून दाखल झाल्याची सुखद बातमी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस लागवड करत आहेत. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसली तरी धुळपेरणी केली जात आहे.