महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दमदार पाऊस, जिल्ह्यातील प्रकल्प 94 टक्के भरले

ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात ११० टक्के पाऊस झाला होता. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ही टक्केवारी १२० पर्यंत गेली आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील माेठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तुडूंब भरले असून एकूण जलसाठा ९४ टक्के झाला आहे.

जळगावात दमदार पाऊस, जिल्ह्यातील प्रकल्प 94 टक्के भरले
जळगावात दमदार पाऊस, जिल्ह्यातील प्रकल्प 94 टक्के भरले

By

Published : Sep 29, 2020, 1:12 PM IST

जळगाव -ऑगस्ट महिन्यातच सरासरी ओलांडणाऱ्या पावसापाठाेपाठ जिल्ह्यातील जलसाठ्याचीही शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकूण ९४ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची नाेंद झाली आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात ११० टक्के पाऊस झाला होता. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ही टक्केवारी १२० पर्यंत गेली आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील माेठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तुडूंब भरले असून एकूण जलसाठा ९४ टक्के झाला आहे. नदी-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू असल्याने ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जलसाठा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

जिल्यातील सर्वात माेठे असे गिरणा आणि वाघूर हे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तापी नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असल्यामुळे हतनूर प्रकल्पातून पाणी साेडण्यात येत आहे. त्याशिवाय अभाेरा, मंगरूळ, सुकी, माेर, अग्नावती, हिवरा, बहुळा, ताेंडापूर, बाेरी आणि मन्याड हे मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details