महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Death by fear of action : नोकरीवरून काढून टाकतील या भीतीने चालकाचा मृत्यू - Fear of being fired

गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने आज अखेर मुक्ताईनगर आगारातील चालका हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू (Death by heart attack) झाला. नोकरीवरून काढून टाकतील या भीतीने (Fear of being fired) व नैराश्यातून कारवाईच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या अंत्यविधीसाठी मदत देण्यात आली.

Death by fear of action
कारवाईच्या भीतीने मृत्यू

By

Published : Dec 18, 2021, 9:09 PM IST

Updated : Dec 18, 2021, 10:26 PM IST

जळगाव:मुक्ताईनगर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले जुने गावातील जितेंद्र गोपाळ नाथजोगी (४५ ) मुक्ताईनगर येथील एस.टी. मध्ये चालक म्हणुन कार्यरत होते. त्यांचे १७ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ह्यदयविकाराने मुक्ताईनगर येथील जुने गावातील जोगीवाडा येथे राहते घरी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात आई , पत्नी , तीन भाऊ , १ बहिण, दोन मुले असा परिवार आहे.


अंत्यविधीसाठी तातडीची मदत
दुपारी १२ वाजता मुक्ताईनगर एस.टी. आगारातील विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक वाहक यांनी घरी येत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले. नंतर एसटी कडुन कुटुंबियांना पाच हजाराची मदत देण्यात आली. यावेळी आगारप्रमुख संदीप साठे , पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.

दुष्काळात तेरावा महिना
अतिशय कमी पगारात आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणारे राज्य परिवहन महामंडळाचे चालक वाहक हे आपल्या मागणीसाठी दोन महिन्यापासून बेमुदत संपावर आहेत. त्यावर शासन तोडगा काढत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच काहींना कर्ज फेडावे कसे कुटुंबाचा गाडा तसेच पालनपोषण कसे करावे असे प्रश्न सतावत आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंत 50 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे त्यातच मुक्ताईनगर येथील चालकाचा मृत्यू झाला.

Last Updated : Dec 18, 2021, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details