जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक शेती पद्धती, जैव इंधन, सोशल मीडियाचा अतिरेक, बालमजुरी तसेच स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी उपाययोजना अशा निरनिराळ्या विषयांवर आधारित मॉडेल्स या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. एकाहून एक सरस मॉडेल्स पाहून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कल्पकतेची प्रचिती येत आहे.
जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची प्रचिती - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदवी प्रदान सभागृहात ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध महाविद्यालयातील 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून 115 प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा ते कलम 370 पर्यंतचे विविध विषय हाताळत विद्यार्थ्यांनी आपला आविष्कार सादर केला. यावरून आजची तरुणाई ज्वलंत प्रश्नावर जागरूक असल्याचे दिसून आले.

पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी आणि शिक्षक अशा 4 गटात आयोजित केलेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल्सद्वारे अत्यंत नाविन्यपूर्ण संशोधन सादर केले आहे. दरम्यान, या स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील डीआरडीओतील शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. जगात भूतकाळापासून संशोधन होत आहे. त्या माध्यमातून मानव आपल्या दैनंदिन आणि भविष्यातील गरजा भागवत आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या समाजनिर्मितीसाठी संशोधनाचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी डॉ. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.