महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalgaon RL Jwellers Raid : राजमल लखीचंद समुहावर ईडीचे छापे; करोडोंची संपत्ती जप्त - Directorate of Enforcement

राजमल लखीचंद समुहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान या थकीत कर्जाप्रकरणी बँकेनं आणि आर. एल. समूहानं परस्परविरोधी दावे केल्यानं वाद सुरुय. स्टेट बँक ऑफ इंडियानं दिल्ली सीबीआयकडं तक्रार केली होती. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून आर. एल. समुहाची चौकशी केली जातेय.

राजमल लखीचंद समुहाची तब्बल 46 तास चौकशी
राजमल लखीचंद समुहाची तब्बल 46 तास चौकशी

By

Published : Aug 19, 2023, 2:25 PM IST

Updated : Aug 19, 2023, 5:59 PM IST

राजमल लखीचंद समुहाची तब्बल ४६ तास चौकशी

जळगाव : येथील राजमल लखीचंद समुहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 525 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या थकीत कर्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जातेय. या चौकशीदरम्यान ईडीने आर.एल. समुहावर शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल 46 तास आर. एल. समुहाच्या ज्वेलर्सची चौकशी केली.चौकशी केल्यानंतर ईडीने 90 लाख रुपये रोख आणि ज्वेलर्समधील सोने सील केले आहे. तसेच या समुहाचे आर्थिक दस्तावेज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन व माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लकीचंद समुहावर ईडीनं छापेमारी केल्यामुळे जळगाव या सुवर्णनगरीत मोठी खळबळ उडालीय.

ईडीने दिली माहिती - ED ने PMLA, 2002 च्या तरतुदीनुसार 17 ऑगस्ट रोजी जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील 13 ठिकाणी छापेमारी केली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवाणी, मनीष ईश्वरलाल जैन लालवाणी, पुष्पा देवी आणि नीतीका मनीष जैन यांच्यासंदर्भात कर्जाच्या फसवणूक प्रकरणी ईडीने छापेमारी केली आहे.

करोडोंची संपत्ती जप्त - छापेमारीवेळी विविध कागदपत्रे, 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्याचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आणि जप्त करण्यात आली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

काय आहे प्रकरण : जळगावच्या आर. एल. समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. थकीत कर्जाप्रकरणी बँकेने आणि आर. एल. समूहाने परस्परविरोधी दावे केल्यानं वाद सुरूय. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्यानं स्टेट बँकेनं दिल्ली सीबीआयकडं तक्रार करत गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या सुमारे 25 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर ईडीनं रोख रक्कम, सोने तसंच आर्थिक दस्तावेज जप्त केले. जप्त करण्यात आलेला ऐवज जळगावमधील एसबीआयच्या मुख्य शाखेत जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

समन्स बजावला : सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून आर. एल. समूहाची चौकशी केली गेली. आर. एल. समूहाच्या नाशिक व ठाणे येथील आस्थापनांवर देखील छापेमारी करण्यात आलीय. दरम्यान ईडीच्या या कारवाईप्रकरणी माजी खासदार तथा आर. एल. समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिलीय. ही फर्म नातेवाईकांच्या नावाने असताना कारवाई करणे चुकीचे असल्याचे ईश्वरलाल जैन म्हणालेत. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी ईश्वरलाल जैन, त्यांचे पुत्र आणि माजी आमदार मनीष जैन, तसेच दोन्ही नातवांचे जबाब नोंदवून घेतलेत. चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्सदेखील बजावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हेही वाचा-

  1. ED Probe Sangli : तब्बल 53 तासानंतर 'त्या' खात्यांची ईडीकडून चौकशी पूर्ण, ईडीच्या रडारवर कोण ?
  2. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?
  3. SC on ED Director : ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवला; 'हे' आहे कारण
Last Updated : Aug 19, 2023, 5:59 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details