जळगाव -कोरोनाच्या लसीबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. कोरोनाचा प्रतिकार करू शकेल, अशी लस विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्यंतरी प्लाझ्मा थेरेपीचा पर्याय समोर आला होता. परंतु, या थेरेपीचा हवा तसा रिझल्ट न मिळाल्याने त्या विषयी सुरुवातीपासून संभ्रम होता. याच अनुषंगाने आता प्लाझ्मा थेरेपीबाबत पुढील निर्देश येईपर्यंत याची क्लिनिकल ट्रायल करू नये, असे निर्देश आरोग्य विभागाने जारी केले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
प्लाझ्मा थेरेपीबाबत पुढील निर्देश येईपर्यंत याची क्लिनिकल ट्रायल करू नये, असे निर्देश स्थानिक कोविड रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत. दोन दिवसापूर्वीच राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये वरिष्ठ पातळीवरून प्लाझ्मा थेरेपीच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
जळगावातही रुग्णांवर झाली प्लाझ्मा थेरेपीची ट्रायल -
जळगाव येथील जिल्हा कोविड रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपीची कोरोनाग्रस्त रुग्णांवर ट्रायल झाली होती. प्लाझ्मा थेरेपीमुळे एक मध्यम तर एक गंभीर रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आहे. मात्र, राज्यात अन्यत्र प्लाझ्मा थेरेपीचे चांगले परिणाम समोर आलेले नव्हते. त्यामुळे, बऱ्याच दिवसांपासून याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. शिवाय सरसकट प्रत्येक रुग्णाला तो देता येत नव्हता. याचे निकष तपासून डॉक्टर निर्णय घेत होते. सुरुवातीला प्लाझ्मा दान करणाऱ्यांचे प्रमाणही अगदीच नगण्य होते. अनेक महिने प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या ही तेराच्या पुढे गेलेली नव्हती.
दोन महिन्यांपूर्वी मिळाली होती मंजुरी -