महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दंतचिकित्सा सुविधा सुरू - dental services started in government hospital

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. कोरोनासह इतर व्याधींच्या आजारावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू झाले आहे. त्यात दंतोपचार विभाग देखील सरु झाला आहे. त्यात मौखिक आजार, दातांची तपासणी, दात काढणे, दात बसविणे, रूट कॅनलद्वारे दातांचे संरक्षण करणे ही सेवा दिली जात आहे.

dental services started in government hospital
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

By

Published : Jan 2, 2021, 2:29 PM IST

जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारची अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता तोंडाच्या कर्करोगावर देखील उपचार होणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.
शासकीय रुग्णालयात दंतोपचार सुरु
शासकीय रुग्णालयात कोरोनासह इतर व्याधींच्या आजारावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू झाले आहे. त्यात दंतोपचार विभाग देखील सरु झाला आहे. त्यात मौखिक आजार, दातांची तपासणी, दात काढणे, दात बसविणे, रूट कॅनलद्वारे दातांचे संरक्षण करणे ही सेवा दिली जात आहे. यासह वयोवृद्ध व्यक्तींच्या दातांच्या कवळ्या, कृत्रिम दात, लहान मुलांच्या दात येण्याबाबतच्या समस्या, अक्कलदाढ काढणे आदी व्याधीवर तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून सेवा देत आहे. यात कक्ष क्र. 214 मध्ये ओपीडी काळात सकाळी नऊ ते एक वाजेदरम्यान सरकारी दरात दंतोपचार सुरु झाले आहे. यात एका वेळी चार रुग्ण तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. त्यासाेबतच तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करणे, उपचार करणे व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणे ही सुविधा देखील सुरु झाली आहे.
दंतोपचार विभाग

दंतोपचार विभागात प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुराधा वानखडे, डॉ. राखी यादव, डॉ. सतीश सुरळकर, तंत्रज्ञ क्षितिज पवार, सहाय्यक सूर्यकांत विसावे सेवा देत आहेत. दंतोपचार करण्यासाठी लाभार्थी रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details