महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात किसान एक्स्प्रेसच्या ५० फेऱ्या; ७ हजार २८५ टन मालाची केली वाहतूक - किसान एक्सप्रेस बद्दल बातमी

कोरोना काळात सुरू झालेल्या किसान एक्स्प्रेसला मुदतवाड द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. या गाडीने आत्तापर्यंत ७ हजार २८५ टन मालाची वाहतूक केली आहे.

demand-for-extension-of-kisan-express-started-during-corona-period
कोरोना काळात किसान एक्स्प्रेसच्या ५० फेऱ्या; ७ हजार २८५ टन मालाची केली वाहतूक

By

Published : Dec 18, 2020, 4:30 PM IST

जळगाव - कोरोना काळात देशातील पहिली किसान एक्सप्रेस सुरू करण्याचा मान भुसावळ विभागाला मिळाला होता. ७ ऑगस्ट ते १७ डिसेंबर या काळात किसान एक्स्प्रेसच्य पाच महिन्यात ५० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या काळात गाडीने ७ हजार २८५ टन मालाची वाहतूक करण्यात आली, त्यातून रेल्वे प्रशासनाला अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

रेल्वेला मिळाले अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न -

भारतीय रेल्वेत महत्त्वपूर्ण असणारा तसेच मध्यप्रदेश आणि विदर्भाला जोडणारा दुवा म्हणून भुसावळ विभागाची ओळख आहे. कोरोनापुर्वी या विभागातून २४ तासांत सुमारे ३२८ रेल्वेगाड्या धावत होत्या. आता गाड्यांची संख्या २०० पर्यंत झाली आहे. कोरोनाच्या काळात शेतमालाची परप्रांतात जलद गतीने वाहतूक करण्यासाठी किसान एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. विभागातील देवळाली स्थानकावरून ७ ऑगस्टला प्रथमच किसान एक्स्प्रेस धावली. प्रारंभी आठवड्यातून एक दिवस धावणारी किसान एक्स्प्रेस आता आठवड्यातून तीन दिवस चालवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालास परप्रांतात चांगला भाव मिळू लागला आहे. कोरोनाच्या काळात रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली ही गाडी शेतकऱ्यांना जणू वरदानच ठरली आहे. अनेक प्रवासी गाड्या बंद झाल्याने रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहेत. अशा काळात पाच महिन्यात किसान एक्स्प्रेसने अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

गाडीला मुदतवाढ द्यावी -

शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून ही गाडी दानापूरऐवजी मुजफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडीला देवळाली, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर, खंडवा या स्थानकांवर थांबा आहे. ही गाडी आता मंगळवार, गुरूवार आणि शनिवार असे तीन दिवस ३१ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. त्यामुळे गाडीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details