चाळीसगाव (जळगाव) -जळगावात झालेल्या गुटख्याच्या कारवाई प्रकरणी पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी यात आर्थिक देवाणघेवाण करून सेटलमेंट केली असून, कुठंतरी पाणी मुरत आहे. या प्रकरणात सहभागी जळगाव एलसीबी व मेहुणबारे पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
अवैध गुटखा कारवाई प्रकरणात पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर - आ. मंगेश चव्हाण - जळगाव बातमी
जळगावात झालेल्या गुटख्याच्या कारवाई प्रकरणात पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. तसेच याविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.
तसेच याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जळगावचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी आपली तक्रार न घेता आपल्याशी अरेरावी केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपण विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारपरिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, पंचायत समिती सदस्य संजय भास्कर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम, नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, ॲड. धनंजय ठोके, जितेंद्र वाघ उपस्थित होते.