जळगाव -कृषी पंपांच्या वीज बिलांची महावितरण कंपनीकडून सक्तीने वसुली होत आहे. या विरोधात भडगाव-पाचोरा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने 7 रोजी टाळे ठोक आंदोलन करण्यात आले होते. भडगावात हे आंदोलन झाल्यानंतर अज्ञात 7 जणांनी महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी एका वायरमनला देखील धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात जमिनीवर पडल्याने वायरमनचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कार्यालयात केलेली तोडफोड गजानन प्रताप राणे (वय 48, रा. जळगाव) असे या घटनेतील मृत वायरमनचे नाव आहे. राणे हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते भडगाव तालुक्यातील कोठली याठिकाणी नियुक्तीला होते.
महावितरण कार्यालयात केलेली तोडफोड काय आहे नेमकी घटना?
कृषी पंपांच्या वीज बिलांची महावितरण कंपनीकडून सक्तीने वसुली होत असल्याने सोमवारी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव व पाचोरा तालुक्यात महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सर्वत्र हे आंदोलन शांततेत पार पडले. परंतु, भडगाव येथे चाळीसगाव रस्त्यावरील कार्यालयात दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात 7 जण आले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना मारहाण करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी हल्लेखोरांच्या तावडीतून धामोरे यांना सोडवण्यासाठी गेलेले गजानन राणे यांनाही मारहाण झाली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
महावितरण कार्यालयात केलेली तोडफोड हेही वाचा -दुचाकींना फाशी.. पाचोऱ्यात काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध
7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल -
या घटनेप्रकरणी रात्री उशिरा उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात 7 जणांविरुद्ध राणे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.