जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यातही जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मंगळवारपासून (7 जुलै) जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुका पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे. लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही पार्श्वभूमीवर सोमवारी जळगावातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
जळगावकरांची बेफिकिरी; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार (7 जुलै) ते सोमवार (13 जुलै) या कालावधित 7 दिवस जळगाव शहर, भुसावळ व अमळनेर तालुक्यात हे लॉकडाऊन असणार आहे. या काळात औषध दुकाने, दूधविक्री तसेच खरेदी व्यवहार सुरू राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवार (7 जुलै) ते सोमवार (13 जुलै) दरम्यान 7 दिवस जळगाव शहर , भुसावळ व अमळनेर तालुक्यात हे लॉकडाऊन असणार आहे. या काळात औषध दुकाने, दूधविक्री तसेच खरेदी व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांना त्यांच्या प्रभागात खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. साहित्यखरेदी करण्यासाठी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहन घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही. याशिवाय तीनही क्षेत्रांतील सर्व आस्थापना, सर्व दुकाने बंद राहतील. उद्यापासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असल्याने जळगावकर नागरिक सोमवारी सकाळपासून खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
किराणा सामान, भाजीपाला त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती आहे. शहरातील सराफ बाजार, सुभाष चौक, दाणा बाजार, फुले मार्केट परिसरात सर्वाधिक गर्दी आहे. उद्यापासून लॉकडाऊन होणार असल्याने गैरसोय नको, म्हणून नागरिक आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यावर भर देत असल्याचे दिसले.