महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे जळगावातील हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा; गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठे नुकसान - अवकाळी पाऊस शेती नुकसान

यंदा खरीप हंगामात अति प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे कापूस, उडीद, मूग, भुईमूग यासारखी पिके खराब झाल्याने शेतातच सोडून द्यावी लागली होती. तेव्हाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याची संपूर्ण आशा रब्बी हंगामातील पिकांवर होती. मात्र, आताही हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून नेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

jalgaon rain news
अवकाळी पावसामुळे जळगावातील हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा

By

Published : Mar 18, 2020, 11:49 PM IST

जळगाव -जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. गहू, हरभरा, दादर, केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. कापणीवर आलेली पिके वादळामुळे जमिनीवर आडवी पडली आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे जळगावातील हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा; गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठे नुकसान

यंदा खरीप हंगामात अति प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे कापूस, उडीद, मूग, भुईमूग यासारखी पिके खराब झाल्याने शेतातच सोडून द्यावी लागली होती. तेव्हाही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्याची संपूर्ण आशा रब्बी हंगामातील पिकांवर होती. मात्र, आताही हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून नेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, चोपडा या तालुक्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाळा चांगला असल्याने विहिरी, कूपनलिका तसेच नद्या-नाल्यांना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली. परंतु, अवकाळीने पुन्हा एकदा घात झाला असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

तत्काळ पंचनामे करण्याची मागणी -

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करावे व तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा जळगाव तालुक्यातील कानळदा, भोकर, किनोद शिवारातील शेतकऱ्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाहणी -

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या त्या गावातील नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल पालकमंत्री यांनी सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची सूचना केली. त्यानंतर पालकमंत्री यांनी जळगाव तालुक्यातील भोकर, भादली, नांद्रा, पिलखेड, सावखेडा, कठोरा, नंदगाव, किनोद आदी गावांना भेट देऊन या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरून 48 तासाच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details