महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन करणे भोवले; खासदार-आमदारांसह 5 हजार जणांवर गुन्हा - जळगाव कोरोना न्यूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू असताना एका जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमांचा भंग केल्याने खासदार-आमदारांसह 5 हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 200पेक्षा अधिक जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही, अशी अट स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली होती. असे असतानाही 4 ते 5 हजार नागरिक मिरवणुकीसाठी एकत्र आले.

By

Published : Sep 28, 2021, 5:02 PM IST

जळगाव - कोरोना नियमांचे उल्लंघन करणे जळगावातील भाजपा खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुखांना भोवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू असताना एका जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून नियमांचा भंग केल्याने खासदार-आमदारांसह 5 हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात 26 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. यानिमित्त 200पेक्षा अधिक जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही, अशी अट स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली होती. असे असतानाही 4 ते 5 हजार नागरिक मिरवणुकीसाठी एकत्र आले. त्यामुळे मिरवणूक परवानगीच्या अटी व शर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून खासदार, आमदार नगराध्यक्षा, माजी आमदार व पुतळा आगमन समिती सदस्य अशा 17 जणांसह 4 ते 5 हजार जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, श्याम देशमुख, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, रामचंद्र जाधव, पं.स. सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी यांच्यासह जणांसह 5 हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details