जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना आणखी एक धक्का बसला आहे. चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंविरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केल्याने मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने ( Court rejected petition of Mandakini Khadse ) आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आणखी धक्का, आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा.. - मंदाकिनी एकनाथ खडसे
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी बाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.
एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का - जळगाव जिल्हा दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी बाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.
न्यायालयाने खडसेंचा दावा फेटाळला - जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंविरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवता येणार नाही, असा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. या विरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, खडसेंचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.