महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार - जळगाव अपघात बातमी

राजपूत दाम्पत्य आज सकाळी आसलगाव येथून त्यांच्या दुचाकीने नातेवाइकांकडे जात होते. दरम्यान, चोपडा शहराकडे जात असताना चोपड्याकडून यावलच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिंचोलीजवळ एका वळणावर राजपूत दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यात राजपूत दाम्पत्य जागीच ठार झाले.

अपघात
अपघात

By

Published : Sep 5, 2020, 5:06 PM IST

Updated : Sep 5, 2020, 5:13 PM IST

जळगाव - भरधाव जाणाऱ्या मालवाहू आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात घडला. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर - बऱ्हाणपूर राज्य मार्गावर जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या चिंचोली गावाजवळ घडला आहे.

अपघात स्थळावरील दृष्ये

पूनमसिंग रतनसिंग राजपूत (वय 52) व त्यांच्या पत्नी संगीता (वय 48) अशी अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. ते बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या आसलगाव येथील रहिवासी होते. राजपूत दाम्पत्य आज सकाळी आसलगाव येथून त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच 30 एजे 1884) नातेवाइकांच्या गावी जात होते. दरम्यान, चोपडा शहराकडे जात असताना चोपड्याकडून यावलच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर (क्रमांक जीजे 27 व्ही 5838) ट्रकने चिंचोलीजवळ एका वळणावर राजपूत दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यात राजपूत दाम्पत्य जागीच ठार झाले.

चिंचोली गावाजवळ रस्त्यावर असलेल्या वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच चिंचोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर यावल पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावलचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रक चालक तौफिक तोहीद पठाण (रा. अहमदाबाद, गुजरात) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -पत्नीला शिक्षिका बनवण्यासाठी कायपण.. स्कुटीवरून 1100 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचले ग्वाल्हेरला

Last Updated : Sep 5, 2020, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details