जळगाव - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 24 तर रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 23 फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघांची ४७ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी - 47 rounds
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 56.12 टक्के तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 61.40 टक्के मतदान झाले आहे. 23 मे ला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. मतमोजणीसाठी 6 कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांची प्रत्येकी 84 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होईल.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 56.12 टक्के तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 61.40 टक्के मतदान झाले आहे. 23 मे ला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येतील. मतमोजणीसाठी 6 कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षात 14 याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांची प्रत्येकी 84 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो ऑफिसर, सुविधा कर्मचारी, टॅब्युलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण 1 हजार 325 इतके कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्षात ठेवणार आहेत. सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. टपाली मतदानाची मोजणी 10 आणि ईटीबीपीएस मतदानाची मोजणी 15 टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येईल. मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लिपची मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.