महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात 238 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 8 जणांचा मृत्यू - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

जळगाव जिल्हा प्रशासनाला रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 238 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेत. त्यात सर्वाधिक 83 रुग्ण हे जिल्ह्यातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

By

Published : Jul 12, 2020, 10:41 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. रविवारी पुन्हा 238 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 962 इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, रविवारी 159 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

जळगाव जिल्हा प्रशासनाला रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 238 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेत. त्यात सर्वाधिक 83 रुग्ण हे जिल्ह्यातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. जळगाव पाठोपाठ चोपडा आणि मुक्ताईनगरात अनुक्रमे 32 आणि 31 रुग्ण समोर आलेत. याशिवाय जळगाव ग्रामीण 7, भुसावळ आणि अमळनेरात प्रत्येकी 6, भडगाव 8, धरणगाव 15, यावल 10, एरंडोल 4, जामनेर 12, रावेर 13, पारोळा 2, चाळीसगावात 9 रुग्ण आढळले आहेत. समाधानाची बाब म्हणजे, रविवारी पाचोरा आणि बोदवडमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील 46 रुग्ण, पारोळ्यातील 22 रुग्ण, यावल आणि रावेरमधील प्रत्येकी 18 तर अमळनेरातील 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 542 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 2 हजार 91 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील 201 रुग्णांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. जिल्ह्यात रविवारी 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात 2 जणांचे मृत्यू हे कोविड रुग्णालयात, 3 जणांचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तर 3 जणांचे मृत्यू हे चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये यावल तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष आणि 75 वर्षीय महिला, एरंडोल आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येक एक 45 वर्षीय पुरुष, चाळीसगाव तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 73 वर्षीय महिला आणि चोपडा तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जळगावातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी -

  • जळगाव शहर - 1420
  • जळगाव ग्रामीण - 261
  • भुसावळ - 555
  • अमळनेर - 459
  • चोपडा - 396
  • पाचोरा - 130
  • भडगाव - 273
  • धरणगाव - 259
  • यावल - 317
  • एरंडोल - 281
  • जामनेर - 335
  • रावेर - 430
  • पारोळा - 315
  • चाळीसगाव - 152
  • मुक्ताईनगर - 178
  • बोदवड - 184
    एकूण - 5962

ABOUT THE AUTHOR

...view details