जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा शहरातील साईमोक्ष क्वारंटाइन सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका 33 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, मंगळवारी सकाळी उजेडात आली.
जळगावात क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन कोरोना संशयित तरुणाची आत्महत्या - जळगाव कोरोना पॉझिटिव्ह केसेस
आत्महत्या करणारा तो तरुण पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी आहे. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे असल्याने तो 19 जुलैला पाचोरा येथील साईमोक्ष क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 20 जुलैला कोरोना चाचणीसाठी त्याचे घशातील स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. असे असताना त्याने सोमवारी मध्यरात्रीनंतर क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करणारा तो तरुण पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी आहे. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे असल्याने तो 19 जुलैला पाचोरा येथील साईमोक्ष क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 20 जुलैला कोरोना चाचणीसाठी त्याचे घशातील स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. असे असताना त्याने सोमवारी मध्यरात्रीनंतर क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास क्वारंटाइन सेंटरमधील काही संशयित रुग्ण उठल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. काहींनी हा प्रकार सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, डॉ. अमित साळुंखे यांनी भेट देत घटनेबाबत माहिती जाणून घेतली. त्याने आत्महत्या का केली? याचे निश्चित कारण समोर आलेले नाही. त्याबाबत पाचोरा पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या भीतीने तो तणावात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून, त्याच्या नातेवाईकांनी देखील तसा दुजोरा दिला आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्या पार्थिवावर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले.