जळगाव- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी 135 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या अहवालात जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममध्ये कार्यरत असलेल्या एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाची एन्ट्री झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कर्मचाऱ्याला झाली लागण
जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या 367 झाली असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात गुरुवारी 135 जणांच्या पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या (एनआरएचएम) कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाची एन्ट्री झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या 367 झाली असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यात गुरुवारी 135 जणांच्या पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या (एनआरएचएम) कर्मचाऱ्याला लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याभरापूर्वी कोविड-19 वॉर रुम तयार केली आहे. या वॉररुममधून जिल्ह्यातील सर्व कोरोना अपेडट व त्यावर नियंत्रण तसेच तक्रारी निवारण आदी सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. या रुममध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हील हॉस्पिटल तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.