महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला बळी... जळगावातील कोरोना रुग्णाचा मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जळगावातील एका 63 वर्षीय वृद्धाचा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  या वृद्धाची कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तो घरातच होता. हा रुग्ण बाहेरगावी कुठेच गेला नसल्याने त्याला कोरोना विषाणुचा संसर्ग कसा झाला? याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.

corona-positive-parson-death-in-jalgaon
corona-positive-parson-death-in-jalgaon

By

Published : Apr 2, 2020, 5:27 PM IST

जळगाव- कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जळगावातील एका 63 वर्षीय वृद्धाचा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धाचा कालच (बुधवारी) रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला होता.

हेही वाचा-कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांनी क्वारंटाईन व्हा, तबलिगी प्रमुखांचे आवाहन

कोरोनामुळे मृत्यू झालेले वृद्ध हे जळगाव शहरातील सालारनगर भागातील रहिवासी होते. त्यांचा फळे विक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. काल रात्री त्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर आज सकाळपासून या वृद्धाची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर दुपारी 3 वाजताच्या सुमारास वृद्धाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले.

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही होता त्रास-
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या वृद्धाला उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा देखील त्रास होता. अशातच कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेल्या विशेष कक्षात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

वृद्धाच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी-
मृत्यू पावलेला संबंधित कोरोना रुग्ण फळ विक्रेता असल्याने या रुग्णाशी अनेकांचा संपर्क झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या 8 ते 10 दिवसात संबंधित रुग्णाचा झालेला वावर याबाबतची माहिती मनपा प्रशासनाकडून घेतली जात आहे. यासह रुग्णाच्या कुटुंबातील 6 व शेजारील 9 अशा 15 जणांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची तपासणी करुन, त्यांचे नमुने घेण्यात येणार आहेत. यासह कोरोनाबाधित व्यक्तीचे फळांचे गोदाम असलेल्या जोशीपेठ भागात देखील संबंधित रुग्ण कोणाकोणाशी भेटला? याचीही माहिती घेतली जात आहे. हा भाग बुधवारी रात्रीच सील केला आहे. या वृद्धाची कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तो घरातच होता. हा रुग्ण बाहेरगावी कुठेच गेला नसल्याने त्याला कोरोना विषाणुचा संसर्ग कसा झाला? याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details