महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर - jalgaon corona update

कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर तब्बल ९६.८४ टक्क्यांपर्यत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

corona patient recovery rate in jalgaon
जळगाव : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर

By

Published : Dec 9, 2020, 3:37 PM IST

जळगाव - कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर तब्बल ९६.८४ टक्क्यांपर्यत पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत माहिती दिली. यानुसार, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (अॅक्टिव्ह रुग्ण) संख्या ४२७ पर्यंत खाली आली आहे. ८ डिसेंबर रोजी ५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५३ हजार १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८४ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे.

जिल्ह्यातील मृत्यूदर २.३८ टक्क्यांपर्यंत खाली

जिल्ह्यात आज एकूण ४२७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १४६ आहे. यातील ३४ रुग्ण अतिदक्षता विभागात असून ७३ रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. तर २८१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३०६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद असून सध्या हा मृत्यूदर २.३८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

जिल्ह्यात फक्त ८७ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५२ हजार ९७३ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले असून पैकी ५४ हजार ८७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या अवघे ८७ अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात २२७ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर ६२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ९६९७ बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३१० तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०१७ व इतर असे एकूण १२८५४ बेड असून त्यापैकी २०१९ ऑक्सिजनयुक्त तर ३२२ आयसीयु बेड आहेत. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-१९ चे नोडल अधिकारी यांनी दिली आहे.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह, बरे झालेले, मृत्यू व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती

  1. जळगाव शहरात आतापर्यंत १२६४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १२२१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर २७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या १५३ रुग्ण उपचार घेत आहेत.
  2. जळगाव ग्रामीणमध्ये आतापर्यंत २५७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २४८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ६ रुग्ण उपचार घेत आहेत.
  3. भुसावळ तालुक्यात आतापर्यंत ४२६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
  4. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत ४४९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ३४ रुग्ण उपचार घेत आहेत.
  5. चोपडा तालुक्यात आतापर्यंत ४४३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या १४ रुग्ण उपचार घेत आहेत.
  6. पाचोरा तालुक्यात आतापर्यंत १९७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १८८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ११ रुग्ण उपचार घेत आहेत.
  7. भडगाव तालुक्यात आतापर्यंत १९२० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १८६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ७ रुग्ण उपचार घेत आहेत.
  8. धरणगाव तालुक्यात आतापर्यंत २२०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ८ रुग्ण उपचार घेत आहेत.
  9. यावल तालुक्यात आतापर्यंत १८३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १७६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ३ रुग्ण उपचार घेत आहेत.
  10. एरंडोल तालुक्यात आतापर्यंत २८०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २७४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ९ रुग्ण उपचार घेत आहेत.
  11. जामनेर तालुक्यात आतापर्यंत ४२०९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४१२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या १५ रुग्ण उपचार घेत आहेत.
  12. रावेर तालुक्यात आतापर्यंत २२६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २१४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या १६ रुग्ण उपचार घेत आहेत.
  13. पारोळा तालुक्यात आतापर्यंत २५३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २५०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details