जळगावContainer Accident Jalgaon:रेखाबाई गणेश कोळी (55 वर्षे), योगिता रविंद्र पाटील (40 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर चंदनबाई नाना गिरासे (50 वर्षे) या महिलेचा उपचारासाठी रुग्णालयात हलवत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. तिघे मयत महिला या ग्राम बोळे, तालुका पारोळा येथील रहिवासी आहेत. तर या अपघातात दोन्ही वाहनांमधील २२ जण जखमी झाले आहेत. (woman killed in accident)
चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची दुसऱ्या दोन वाहनांना धडक; तीन महिलांचा मृत्यू
Container Accident Jalgaon: जळगावातील पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग सहा वरील वीजखेडे गावानजीक ट्रक आणि दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात तीन महिला ठार तर (Container collides with two vehicles) 22 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
Published : Dec 1, 2023, 10:44 PM IST
कंटेनरवरील ताबा सुटल्याने झाला अपघात:पारोळा तालुक्यातील बोळे येथून शिंदखेडा येथे एका अंत्यसंस्कारासाठी करंजीहून २२ जण पारोळा अंमळनेर मार्गे शिंदखेड्याकडे (MH -18-M-5554) या क्रमांकाच्या वाहनाने जात होते. या दरम्यान आज सकाळी १२ वाजता पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ पारोळाकडून धुळ्याकडे जात असलेल्या (GJ -12-BW -7254) या क्रमांकाच्या कंटेनर वरील चालकाचा ताबा सुटला. यात कंटेनरने अंत्यसंस्कारासाठी शिंदखेडाकडे जाणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर आणखी दुसऱ्या एका नव्या पासिंगसाठी जाणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या वाहनातील दोन जणी जागीच ठार झाल्या. तर एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले जात असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. तर या अपघातात २२ जण गंभीर जखमी झालेत. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमीच्या नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी:जखमींमध्ये रंजित सुरधिंग गिरासे (60 वर्षे), भरत रामभाऊ गिरासे (65 वर्षे), राजेराबाई सखरा कोळी (45 वर्षे), भिमकोर सत्तरसिंग गिरासे (50 वर्षे), भुराबाई मोनसिंग गिरासे (40 वर्षे), भुराबाई तात्या गिरासे (40 वर्षे), रेखाबाई अधिकार गिरासे (50 वर्षे), नानाभाऊ सुभाष गिरासे (55 वर्षे), भटाबाई साहेबराव गिरासे (45 वर्षे), सुनिता नारायण गिरासे (44 वर्षे), भुरावाई भिमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (50 वर्षे), सय्यद कियाखत (मालेगांव) (21 वर्षे) (न्यू पिक अप चालक), हिराबाई विजयसिंग गिरासे (५० वर्षे), भिमकोरबाई जगत गिरासे (60 वर्षे), भगवानसिंग नवलसिंग गिरासे (65 वर्षे), रजेसिंग भारतसिंग गिरासे (55 वर्षे) (पिकअप चालक), रूपसिंग नवलसिंग गिरासे (60 वर्षे), दखाबाई रूपसिंग गिरासे (55 वर्षे), राजेबाई साहेबराव कोळी (45 वर्षे) असे एकूण २२ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे पारोळा येथील कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते. अपघाताचे वृत्त कळताच बोळे गावासह परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.
हेही वाचा: