महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसकडून योगी आदित्यनाथांच्या पुतळ्याचे दहन; राहुल गांधींच्या अटकेचा नोंदवला निषेध - जळगाव काँग्रेस आंदोलन बातमी

हाथरस येथे नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे आज देशात महिला सुरक्षित नसल्याचे विदारक चित्र आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे, काँग्रेसचे नेते राहुल गांधींना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ दिली जात नाहीये. त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी रस्त्यातच धक्काबुक्की करत मज्जाव केला. ही बाब लोकशाहीचा गळा घोटणारी आहे.

congress protest against rahul gandhis arrest and hathras incident in jalgaon
काँग्रेसकडून योगी आदित्यनाथांच्या पुतळ्याचे दहन

By

Published : Oct 1, 2020, 6:40 PM IST

Updated : Oct 1, 2020, 6:59 PM IST

जळगाव - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गुरुवारी दुपारी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पायी हाथरस येथे निघाले असता, उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत अटक केली. या दोन्ही घटनांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत जळगावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.

काँग्रेसकडून योगी आदित्यनाथांच्या पुतळ्याचे दहन; राहुल गांधींच्या अटकेचा नोंदवला निषेध

राहुल गांधींना अटक झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून येताच जळगावातील काँग्रेस आणि एनएसयुआयचे कार्यकर्ते काँग्रेस भवनात दाखल झाले. त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उत्तरप्रदेशात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्याठिकाणी दिवसाढवळ्या महिला व मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे समाजमन सुन्न झाले असून, नैतिक जबाबदारी म्हणून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. हाथरस येथे नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे आज देशात महिला सुरक्षित नसल्याचे विदारक चित्र आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे, काँग्रेसचे नेते राहुल गांधींना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ दिली जात नाहीये. त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधींना उत्तरप्रदेश पोलिसांनी रस्त्यातच धक्काबुक्की करत मज्जाव केला. ही बाब लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार हे लोकशाहीचा अपमान करत आहे. या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत, अशाही संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

आंदोलकांच्या मागण्या -

या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, सर्व आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेला त्वरित न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.

Last Updated : Oct 1, 2020, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details