महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात 'भारत बंद' संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने सक्तीने केली दुकाने बंद

जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

Jalgaon congress agitation
Jalgaon congress agitation

By

Published : Sep 27, 2021, 11:55 AM IST

Updated : Sep 27, 2021, 12:29 PM IST

जळगाव -केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

प्रतिक्रिया

केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या बाबीचा निषेध नोंदवण्यासह दिल्लीतील आंदोलनाला पाठबळ म्हणून आज काँग्रेससह देशभरातील समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. याच अनुषंगाने आज जळगावातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांनी भारत बंद पाळला जात आहे.

बाजारपेठ सुरू, नेते उतरले रस्त्यावर -

आज देशव्यापी भारत बंद आंदोलन असताना जळगावात मात्र सकाळपासूनच बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील बाजारपेठेचा मुख्य भाग असलेल्या महात्मा फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केट, नवी पेठ भागात फिरून दोन्ही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. एक दिवस शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, काही व्यापारी दुकाने बंद करत नसल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

हेही वाचा - झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 'भारतबंद' - नाना पटोले

'भारत बंद' यशस्वी करण्याचे नेत्यांचे आवाहन-

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भारत बंद आंदोलनाची भूमिका मांडताना सांगितले की, केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणारे आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र सरकारला त्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे आंदोलन अधिक तीव्र व्हावे, याच अनुषंगाने आज भारत बंद पाळला जात आहे. हा बंद सर्वांनी यशस्वी करून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील यावेळी मत मांडले. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी रस्त्यावर येईल. व्यापारी आणि भांडवलदारांची मर्जी चालेल. केंद्राने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.

कशासाठी आहे शेतकऱ्यांचे आंदोलन? -

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाचेवतीने आंदोलन सुरू आहे. हे आदोलन आथा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. आज(सोमवारी) सकाळी 6 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस आणि आपने पाठिंबा जाहीर केला आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कृषी कायदे संसदेत मंजूर करण्यात आले होते. हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

हेही वाचा - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद, गाझीयाबाद मार्ग बंद करणार

Last Updated : Sep 27, 2021, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details