महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; जळगावातील १६ जणांवर गुन्हे दाखल - जळगाव कोरोना अपडेट्स

जळगावात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

jalgaon lockdown
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; जळगावातील १६ जणांवर गुन्हे दाखल

By

Published : Jun 7, 2020, 6:34 PM IST

जळगाव - लॉकडाऊनच्या काळात ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतर व आधीच दुकान, खानावळ व मटन हॉटेल उघडे ठेवणाऱ्या १६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा कारवाई केली. या १६ जणांविरुद्ध लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करून वेळेचे नियोजन करीत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. अशात दिलेला वेळ संपूनही दुकान, मटन हॉटेल, खानावळ सुरू ठेवणाऱ्या १६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. यात सुमित ज्ञानेश्वर पाटील (रा. तांदलवाडी) यांची भुसावळ रोडवरील केकबाईट नावाची बेकरी, रणजित स्वरुपचंद जैन (रा. हनुमाननगर) यांचे जोशी कॉलनीतील आनंद किराणा दुकान, मनोज विजय गावित यांचे गोदावरी कॉलेज समोरील नुपूर हॉटेल, गिरीश प्रकाश धनगर यांचे नारखेडे मटन हॉटेल, राजकुमार नारायण पाटील यांचे नारखेडे मटन हॉटेल, मतीन अहमद पटेल, देविदास तुकाराम पाटील, अनीस खान सुलतान खान, वजीर गुरुमुख राठोड, देवराम लाला भंगाळे, नामदेव वसंत वंजारी, नितीन सुकदेव सोनवणे, आशिष लखीमचंद सिगवीरा, फरिदा बानो मोहम्मद रईस, सुनील राधा मोरे या सर्वांचे किराणा दुकान तसेच अकिल कय्यम खाटीक याचे मासळी विक्रीचे दुकान बेकायदेशीपणे सुरू होते. या सर्व १६ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, २६९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर प्रशासन थेट गुन्हे दाखल करत आहे. दुचाकीवर डबल सीट, तसेच कारमध्ये तीनपेक्षा जास्त लोक असतील तर अशा लोकांवर देखील कारवाई केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details