महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महर्षी वाल्मिकींशी तालिबानींची तुलना: जळगावात शायर मुनव्वर राणा विरोधात गुन्हा दाखल

मुनव्वर राणा यांनी रामायणकार व कोळी समाज बांधवांचे आदर्श महर्षी वाल्मीक यांची तुलना तालिबान्यांशी केली. त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचे तक्रारदार भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

जळगावात शायर मुनव्वर राणा विरोधात गुन्हा दाखल
जळगावात शायर मुनव्वर राणा विरोधात गुन्हा दाखल

By

Published : Aug 20, 2021, 4:41 PM IST

Updated : Aug 20, 2021, 5:03 PM IST

जळगाव -अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेत आल्यानंतर देशातील अनेकजण उलटसुलट प्रतिक्रिया देत आहे. अशीच प्रतिक्रिया वृत्तवाहिनीवर देताना शायर मुनव्वर राणा यांनी महर्षी वाल्मिकींविषयी अपशब्द वापरल्याचे बोलले जात आहे. त्याचे तीव्र पडसाद आज जळगावात उमटले.

कोळी समाजबांधव शायर राणा यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. राणा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील कोळी समाजबांधवांसह भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. राणा यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोळी समाजबांधवांकडून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

राणा यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोळी समाजबांधवांकडून तीव्र शब्दात निषेध

हेही वाचा-अफगाणिस्तान दुतावासासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून 6 आठवड्यांची स्थगिती

काय आहे नेमके प्रकरण?

शायर मुनव्वर राणा यांनी एका वृत्त वाहिनीमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. मुनव्वर राणा यांनी रामायणकार व कोळी समाज बांधवांचे आदर्श महर्षी वाल्मीक यांची तुलना तालिबान्यांशी केली. त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचे तक्रारदार भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-मुनव्वर रानांकडून तालिबानचे समर्थन, म्हणाले भारतात रामराज नाही, कामराज!

महर्षी वाल्मीकी यांच्याशी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना

शायर मुनव्वर राणा म्हणाले, की भारताने अफगाणिस्तान नाही तर पाकिस्तानला घाबरण्याची गरज आहे. तालिबानींना काश्मीरशी काहीही देणे-घेणे नाही. राणा यांनी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना महर्षी वाल्मीकी यांच्याशी केली. वाल्मिकी हे सुरुवातीला कोण होते? त्यानंतर काय झाले? तालिबानीही पूर्वीपेक्षा बदलले आहेत. आता, पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही.

हेही वाचा-ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची काढली पोस्ट, नियमभंग केल्याचे दिले कारण



कोळी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या-

शायर मुनव्वर राणा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे कोळी समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत तक्रार केल्याने शनिपेठ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत किशोर बाविस्कर, मुकूंदा सोनवणे, नंदकुमार सपकाळे यांच्यासह अनेक कोळीसमाज बांधवदेखील उपस्थित होते. याप्रकरणी राणा यांना तातडीने अटक करण्याचीही मागणी कोळी समाजबांधवांकडून करण्यात आली. राणा यांच्या विरोधात कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Last Updated : Aug 20, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details