जळगाव - मागील आठवड्यात जळगावातील बाजार समित्यांचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी तयार आहे. परंतु बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना एकतर त्यांचे पिक कमी भावामध्ये विकावे लागत आहे. अथवा घरी घेऊन जावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी वरील बाजार समित्यांमध्ये फक्त धान्य खरेदीचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये धान्याचे व्यवहार लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत.
हेही वाचा...बँकेतील गर्दी टाळण्यासाठी 'बदनापूर पॅटर्न', बँक प्रतिनिधींद्वारे महिला व वृद्धांना घरपोच सेवा