महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Shinde On Uddhav Tackeray : अन्यथा...'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Industries Minister Uday Samant

आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलू नये, अन्यथा त्यांच्या 'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल, असा टीकेचा बाण मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलाय. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं बोलत होते.

Eknath Shinde On Uddhav Tackeray
Eknath Shinde On Uddhav Tackeray

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 10:26 PM IST

जळगाव : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी 'सरकार आपल्या दारी' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथं राबवण्यात आलाय. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल :आज पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयाच्या प्रांगणावर राज्यातील पहिल्या शासकीय महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटनेते उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. 'G-20' परिषदेच्या निमित्तानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. एक भारतीय माणूस म्हणून त्यांना भेटून आनंद झाला. या बैठकीत त्यांनी ब्रिटनला येण्यास सांगितले. दरवर्षी ते लंडनमध्ये येऊन संपत्ती घेतात. त्यांची तुम्हाला सविस्तर माहिती देणार असल्याचे सुनक यांनी सांगितलं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला. त्यामुळं आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलू नये, अन्यथा त्यांच्या 'पाटणकर काढा' घेण्याची वेळ येईल, असा जोरदार प्रहार मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय.

अनेकांना पोटदुखी :अडीच वर्षांच्या घरी बसून सरकार चालवणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. अनेकांना लाभ देत सरकार त्यांच्या दारात येत असल्याचं पाहून अनेकांना पोटदुखी झालीय. या पोटदुखीवर उपचार करण्यासाठी लवकरच आम्ही डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय. डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रमामुळं त्यांची पोटदुखीही कमी होईल असा निशाना त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधलाय. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी ऋषी सुनक-एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर टीका केली होती. शिंदे सुनक यांच्याशी काय बोलले असतील, असा खोचक टोला त्यांनी शिंदेंना त्यावेळी लगावला होता. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी आज पाचोऱ्यात उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर देखील त्यांनी टोकेचा बाण सोडलाय.

थापा मारतात लई भारी :सरकारच्या या सर्व चांगल्या गोष्टींचा गैरफायदा घेत विरोधक काहीही तथ्य नसताना आमच्यावर टीका करत आहे. शासन आपल्या दारी थापा मारतात लई भारी, असं काही उद्धट लोक म्हणतात. बसले अडीच वर्षे घरी, माहिती घेताहेत वरी वरी… पण आमचं शासन जातंय घरोघरी… लाभार्थ्यांना देतंय स्टेजवरी… सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करी. म्हणून लाखोंची गर्दी होतेय कार्यक्रमांवरी, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले...
  2. Nawab Malik Relief : नवाब मलिकांना मानहानी प्रकरणात शिवडी न्यायालयाचा दिलासा, काय आहे नेमकं प्रकरण?
  3. Vijay Wadettiwar On Teacher Recruitment: आता शिक्षकही कंत्राटी, सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव- विजय वडेट्टीवार यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details