महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2020, 5:34 PM IST

ETV Bharat / state

जळगाव पोलिसांची गांधीगिरी, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या हाती दिले 'असे' फलक

कोरोनाला लढा देण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी आता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे.

Jalgaon
जळगाव पोलिसांची गांधीगिरी

जळगाव- कोरोना विषाणूचा अटकाव होत नसल्याने राज्य सरकारने राज्यभरात निवासी भागात कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली आहे. मात्र, जळगाव शहरात संचारबंदीचे सर्रासपणे उल्लंघन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना मारझोड करुनही फरक पडत नसल्याने जळगाव पोलिसांनी गांधीगिरी करत अनोखी शक्कल लढवली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या हाती पोलिसांनी 'मैं समाज का दुश्मन हूं, घर में नही बैठुंगा...' असे फलक दिले आहेत. या प्रकाराचे चित्रीकरण तसेच छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या हाती दिले फलक

हेही वाचा -कोरोनाची भीती ग्रामीण भागातही... पापडांच्या हंगामालाही फटका

कोरोनाला लढा देण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी आता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिक कोणत्याही ठोस कारणाविना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले. मात्र, तरीही नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने पोलिसांनी थेट गांधीगिरी करायला सुरुवात केली आहे. 'मैं समाज का दुश्मन हूं, घर में नही बैठुंगा...' असे फलक विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांच्या हाती देत पोलिसांनी त्यांची लाज काढली आहे. अनेक जण हे फलक पाहून चांगलेच खजील झाले.

  • काहींना उठबशा काढण्याची शिक्षा -

राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. जळगावात ठिक-ठिकाणी कारवाई सुरू आहे. पोलीस आदेश न पाळणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देत आहेत. काहींना उठबशा काढण्याचीही शिक्षा केली जात आहे.

हेही वाचा -कोरोनाचा फटका : जळगावात आवक मंदावल्याने भाजीपाला कडाडला

ABOUT THE AUTHOR

...view details