जळगाव- शहरातील चोपडा मार्केटमध्ये काम करणार्या दुकानातील कामगाराने दुकानात विक्रीसाठी ठेवलेले ४ लाखाचे सिगारेटचे बॉक्स लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिगारेट लांबवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. सागर पाटील (वय २४ रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दादावाडी परिसरातील वृद्धांवन कॉलनीतील रहिवासी रामचंद्र पुंडलीक पाटील यांचे भजे गल्लीतील चोपडा मार्केटमध्ये भारद्वाज एजन्सी नावाचे सिगारेट विक्रीचे दुकान आहे. रामचंद्र यांच्याकडे सागर जयंत पाटील हा युवक कामाला होता. रामचंद्र पाटील यांचा सागरवर विश्वास संपादन झाल्यामुळे त्यांनी सिगारेट विक्रीची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती.
सागर पाटील याने ३० जून ते १९ ऑक्टोंबर पर्यंत दुकानातून वेळोवेळी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुकानातील फोर स्न्वेअर सिगारेटचे १२० बॉक्स, मालबोरो सिगारेटचे ७०, असे एकूण ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे १२० बॉक्स लंपास केले.
संशयित आरोपीने पुरावा नष्ट केला