जळगाव - शहरातील चित्रा चौकातील चौरसिया कृषी केंद्र अज्ञात चार चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून गल्ल्यातील १७ ते १८ हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चारही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, विजयकुमार रमेश चौरसिया (५०) रा. तहसील कचेरीसमोर बळीराम पेठ यांचे शहरातील चित्राचौकात चौरसिया कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. याठिकाणी कृषी किटकनाशके आदींची विक्री केली जाते. दुकानाला तीन शटर आहेत. दरम्यान, आज सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार चोरटे दुकानासमोर आले. काही वेळ दुकानाच्या पायरीजवळ बसले. आजूबाजूला टेहाळणी केली. त्यानंतर चार जणांपैकी दोघांनी कटर आणि टॉमीच्या मदतीने दुकानाचे मधले शटर उचकटून दुकानातील गल्ला स्क्रृ ड्रायव्हरने उघडला. यानंतर त्यात ठेवलेले अंदाजे १७ ते १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा सर्व प्रकार दुकानाच्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा -अष्टविनायक दर्शन : पृथ्वीतलावरील पहिले गणेशाचे मंदिर, जाणून घ्या मोरेश्वराची अख्यायिका