जळगाव- परदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना अमळनेर येथे घडली. अमळनेर येथील एक दाम्पत्य थायलंड व बँकॉक येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, ही बाब ते लपवत होते. कोरोनाबाबत तपासणी करणाऱ्या पथकापासून त्यांनी खरी माहिती लपविली तसेच शासनाची दिशाभूल केली म्हणून त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. कोरोना संदर्भात दाखल झालेला हा गुन्हा राज्यातील पहिला गुन्हा मानला जात आहे.
या दाम्पत्याला सद्यस्थितीत 15 दिवसांसाठी स्वयंम विलीनीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांना कोरोनाची लक्षणे नसली तरी आरोग्य पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमळनेरात आतापर्यंत 2 दाम्पत्य व एक तरुण असे 5 जण परदेशात गेले होते. त्यांना सद्यस्थितीत प्रतिबंधक उपाय म्हणून 15 दिवसासाठी स्वयंम विलिनीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा -#codid19: जळगावातील मुक्ताई संस्थानातील एकादशी वारी रद्द...