महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण - jalgaon Crime news

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

जखमी व्यावसायिक
जखमी व्यावसायिक

By

Published : Jan 16, 2020, 10:42 PM IST

Updated : Jan 16, 2020, 11:25 PM IST

जळगाव- शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेण्याच्या सुमारास व. वा. (वल्लभदास वालजी) वाचनालयानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये घडली. महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी ही मारहाण केल्याचे समजते.

पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाचा आणि महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्याचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमध्ये महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायिकाला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या तोंडावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

हाणामारीत खाली पडल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेत काही जणांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला. जखमी बांधकाम व्यावसायिकाला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, राजकुमार अडवाणी आदींसह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.

हेही वाचा - वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगाम धोक्यात; शेतकरी हवालदिल

Last Updated : Jan 16, 2020, 11:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details