जळगाव - जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिमराव स्मृती प्लॉट परिसरात भर दिवसा बंद घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी हे घर फोडून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगावात भरदिवसा घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास - जळगाव क्राइम
आशा भिमराव महाजन (वय-६५) १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडलेला दिसला. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी हात साफ केला होता.

बेडरुममध्ये असणाऱ्या कपाटामधील ४७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १८ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे स्पष्ट झालेय याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप सोनार करत आहेत.