जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात असलेल्या शिंगटे मळा परिसरातील एका विहिरीत बैल पडला होता. ही बाब वेळीच लक्षात आल्याने नागरिकांनी विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. विहिरीत पाणी होते, बैलाला वेळीच बाहेर काढले नसते तर त्याचा मृत्यू होण्याची भीती होती. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीने काढले बाहेर; चाळीसगावातील घटना - विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीने काढले बाहेर जळगाव बातमी
चाळीसगाव शहरातील शिंगटे मळा परिसरातील एका विहिरीचा संरक्षक कठडा तुटलेला आहे. त्यामुळे एक बैल विहिरीत पडला होता. विहिरीत पाणी असल्याने बैलाचा मृत्यू होण्याची शक्यता होती.
हेही वाचा-नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद
चाळीसगाव शहरातील शिंगटे मळा परिसरातील एका विहिरीचा संरक्षक कठडा तुटलेला आहे. त्यामुळे एक बैल विहिरीत पडला होता. विहिरीत पाणी असल्याने बैलाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ बैलाला दोर बांधून त्याला पाण्यात तरंगत ठेवले. बैलाचे वजन जास्त असल्याने त्याला बाहेर ओढून काढणे शक्य नव्हते. शेवटी जेसीबी आणण्यात आली. अथक परिश्रमानंतर जेसीबीच्या सहाय्याने बैलाला बाहेर काढण्यात आले. या घटनेत बैलाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून बैलावर उपचार करण्यात आले. दरम्यान, विहिरीचा संरक्षक कठडा तुटलेला असल्याने याठिकाणी जीवितहानी होण्याची भीती आहे. लहान मुले देखील याठिकाणी खेळत असतात. त्यामुळे विहीर मालकाने संरक्षक कठडा दुरुस्त करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली.