महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: रागाच्या भरात शालकाकडून मेहुण्याचा खून... - जळगाव क्राईम बातमी

परमेश्वर पारधी याच्या बहिणीचे तीन वर्षांपूर्वी भागवत पारधी याच्याशी लग्न झालेले होते. लग्न झाल्‍यानंतर काही दिवसच परमेश्वरची बहीण सासरी राहिली. लग्नानंतर पती-पत्‍नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे ती काही दिवसातच माहेर आली.

brother-in-laws-murder-at-jamner-jalgaon
रागाच्या भरात शालकाकडून मेहुण्याचा खून...

By

Published : Jul 30, 2020, 6:45 PM IST

जळगाव-बहिणीला नांदवत नसल्याचा राग मनात धरुन शालकाने मेहुण्याच्या गळ्यावर चाकूने वार करत निर्घृणपणे खून केला. जामनेर तालुक्यातील लहासर गावाच्या फाट्यावर बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. भागवत मोतीराम पारधी (चिंचखेडा बुद्रुक, ता. जामनेर) असे या घटनेतील मृत मेहुण्याचे नाव असून, परमेश्‍वर प्रकाश पारधी (रा. नेरी, ता. जामनेर) असे संशयित आरोपी असलेल्या शालकाचे नाव आहे.

रागाच्या भरात शालकाकडून मेहुण्याचा खून...

परमेश्वर पारधी याच्या बहिणीचे तीन वर्षांपूर्वी भागवत पारधी याच्याशी लग्न झालेले होते. लग्न झाल्‍यानंतर काही दिवसच परमेश्वरची बहीण सासरी राहिली. लग्नानंतर पती-पत्‍नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. त्यामुळे ती काही दिवसातच माहेर आली. माहेरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठवले. पण पती-पत्‍नीमध्ये सातत्‍याने वाद होत राहायचे. यामुळे ती वारंवार माहेरी येत असे.

ही बाब परमेश्‍वर पारधी याला खटकत होती. यामुळे त्‍याच्या मनात भागवत पारधी यांच्याबद्दल राग निर्माण झाला होता. यामुळे मेहुण्याला अद्दल घडवायची, हे परमेश्वरने मनाशी ठरवले होते. नेरी आणि चिंचखेडा बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये अवघे ७ किमीचे अंतर आहे. शिवाय चिंचखेड्याहून जामनेरला जाण्यासाठी नेरी गावाहून जावे लागते. बहिणीला नांदवत नसल्याचा राग असलेला शालक परमेश्‍वर पारधी याने मेहुणे भागवत पारधी यांना जामनेर- बोदवड रस्‍त्‍यावर लहासर गावाच्या फाट्यावर रस्‍त्‍यातच रोखले. बहिणीला का वागवत नाहीस, म्‍हणत त्‍याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात भागवत पारधी यांचा मृत्‍यू झाला.


मेहुण्याचा खुन करुन संशयित आरोपी परमेश्‍वर हा रक्‍ताने भरलेल्या चाकूसह स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. मी माझ्या मेहुण्याचा खून केला आहे, अशी कबुली त्याने दिली. यानंतर पोलीस त्‍यास घटनास्‍थळी घेवून गेले होते. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details