महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात उकळत्या दुधात पडून चिमूरड्याचा मृत्यू - Child dies after falling into milk in Jalgaon

13 ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळेत अंगणातील चुलीवर दुध तापवण्यासाठी ठेवले होते. यावेळी रोहन त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. खेळता खेळता रोहन हा चुलीजवळ गेला त्यानंतर तो उकळत्या दुधात पडला आणि...

Boy dies after falling into boiling milk in Jalgaon
जळगावात उकळत्या दुधात पडल्याने चिमूरड्याचा मृत्यू

By

Published : Oct 28, 2021, 2:56 PM IST

Updated : Oct 28, 2021, 3:49 PM IST

जळगाव - अंगणात खेळत असताना चुलीवरील उकळत्या दुधात पडून एका अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पिंप्री खुर्द तालुका धरणगाव येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • खेळता खेळता पडला उकळत्या दुधात -

रोहन सुभाष धोबी असे मृत बालकाचे नाव आहे. रोहनचे आजोबा एका दुध डेअरीवर कामाला आहेत. त्यामुळे रोहनच्या घरी तीन लिटर दुध रोज येते. दरम्यान 13 ऑक्टोबर रोजी सकाळच्या वेळेत अंगणातील चुलीवर दुध तापवण्यासाठी ठेवले होते. यावेळी रोहन त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. खेळता खेळता रोहन हा चुलीजवळ गेला त्यानंतर तो उकळत्या दुधात पडला.

  • उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू -

रोहन उकळत्या दुधात पडल्याचे त्याच्या घरच्यांच्या लक्षात येताच सर्वांनी चुलीकडे धाव घेतली व त्यास तात्काळ जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले. रोहन 36 टक्के भाजला होता. येथील डॉक्टरांनी रोहनवर प्राथमिक उपचार करत त्याला मुंबईला हलविण्यास सांगितले त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवस त्याच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोहनने मृत्यूला कवटाळले.

हेही वाचा -हजारो क्विंटल संत्रा फेकल्या रस्त्यावर, शेतकरी झाला हतबल;ईटीव्ही भारत'कडून आढावा

Last Updated : Oct 28, 2021, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details