महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Workers Meeting In Chalisgaon : भाजपकडून निवडणुक तयारी; चाळीसगावध्ये कार्यकर्ता मेळावा - BJP elections I Jalgaon

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागलेले असताना अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लवकरच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. (BJP Workers Meeting In Chalisgaon ) या पार्श्वभूमीवर चाळीसगावमध्ये विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटित व एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे.

चाळीसगावध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा
चाळीसगावध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा

By

Published : Mar 7, 2022, 7:01 AM IST

जळगाव - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागलेले असताना अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लवकरच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. (BJP Workers Meeting In Chalisgaon ) या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचे वारे जळगावात सुरू झालेले पाहायला मिळत असून भाजपने यात पुढाकार घेत चाळीसगावमध्ये विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटित व एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे.

व्हिडिओ

भाजपने सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले

गेल्या वर्षभरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के सहन करावे लागले त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये देखील उदासीनता आली होती. मात्र, आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेवर कमळ फुलवून एक हाती सत्ता मिळवत भाजपचे अस्तित्व जिल्ह्यात टिकवण्याचा प्रयत्न हा भाजपचा असणार आहे यासाठी आतापासूनच भाजपने सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम सुरू केले आहे.

आगामी निवडणुका सर्व पक्ष स्वबळावर लढवू शकतात

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आगामी निवडणुका सर्व पक्ष स्वबळावर लढवू शकतात. त्या पार्श्वभूमीवर भाजपनेही कंबर कसली आहे. आगामी निवडणुकींचा श्रीगणेशा करण्यासाठी आतापासूनच जोमाने तयारी करण्यास सुरुवात केल्याचे या या मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -'बेकायदेशीर बांधकाम तोडा, अन्यथा कारवाई करू', मुंबई मनपाची नारायण राणेंना नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details