महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप कार्यकर्त्यांनी पीएम केयर फंडसाठी दिले ३५ लाख - how to donate money in PM care

काेराेनासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतंर्गत पीएम केअर फंडात निधी देण्यासाठी भाजपने अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील २० मंडळातून कार्यकर्त्यांनी ३५ लाख रूपये या फंडात जमा केले आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी पीएम केयर फंडसाठी दिले ३५ लाख
भाजप कार्यकर्त्यांनी पीएम केयर फंडसाठी दिले ३५ लाख

By

Published : Apr 19, 2020, 8:21 AM IST

जळगाव - काेराेनासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतंर्गत पीएम केअर फंडात निधी देण्यासाठी भाजपने अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील २० मंडळातून कार्यकर्त्यांनी ३५ लाख रुपये या फंडात जमा केले आहे. शहरी आणि ग्रामीण या दाेन्ही भागातून या फंडात ५ काेटी जमा करण्याचा निर्धार जिल्हा भाजपतर्फे केला आहे.

भाजपने एप्रिल महिन्यात स्थापना दिनाच्या निमित्ताने पीएम केअर फंडात निधी देण्यासाठी बुथपातळीवर कार्यकर्त्यांना आवाहन केले हाेते. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना व्हिडीओ काॅन्फन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले हाेते. त्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात भाजपकडून निधीसाठी अभियान हाती घेण्यात आले. सध्या बुथपातळीवर कार्यकर्ते स्वत: व नागरिकांकडून पीएम केअर फंडात ऑनलाईन पैसे टाकत आहेत.

शनिवारपर्यंत यात फंडात ग्रामीण भागातून ३५ लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांशिवाय खासदार, आमदार, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनाही उद्दिष्ट दिले आहे. जिल्हाभरातून जवळपास ५ काेटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details