जळगाव- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले आहेत. दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात एकत्र येऊन विजयोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, विजयी उमेदवार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला होता.
जळगावात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला विजयोत्सव - Prashant Bhadane
जळगावात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला विजयोत्सव
जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उन्मेष पाटील आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवल्याने भाजप आणि सेनेचे नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपच्या बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयात एकत्र आले होते. सर्वांनी एकमेकांना पेढे व लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल व ताशांच्या गजरात बेभान होऊन नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून नेत्यांना देखील त्यांच्यासोबत नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.